आरिफ शेख मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी सोमवारी मोर्चा
पाटोदा, ता.१३ : तालुक्यातील आरिफ तकदीर शेख यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी सोमवारी (ता. १६ नोव्हेंबर) बीडमध्ये जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती विजयसिंह बांगर यांनी दिली आहे.
शेख यांचा २७ सप्टेंबर २०२६ रोजी संशयास्पद मृत्यू झाला होता. हा मृत्यू अपघाती नसून हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करून मृत्यूमागील सत्य समोर आणावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यासंदर्भात बांगर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे. या प्रकरणाचा स्वतंत्र विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) निष्पक्ष व पारदर्शक तपास करावा यासह अन्य मागण्यांसाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी सकाळी १० वाजता बीड शहरातील बशीरगंज येथून मोर्चाला सुरवात होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे. यावेळी विजयसिंह बांगर, मोईन मास्तर, ॲड. शेख शफीक, सय्यद आबेद, खुर्शीद आलम, इलियास इनामदार, खमर अली खान, सलमान शेख, अखिल शेख, कादर शेख आदी उपस्थित होते.
----------------------------