Justice For Santosh Deshmukh and Somnath Suryawanshi : संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या निषेधार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चात सहभाग घेण्यासाठी सकल मराठा समाजाने मनोज जरांगे आणि देशमुख कुटुंबाला निमंत्रण दिले.
छत्रपती संभाजीनगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा कोठडीतील मृत्यू या दोन्ही घटनांचा निषेध करत न्याय मागण्यासाठी सर्वधर्मीय, सर्वजातीय जनआक्रोश मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.