फोटो PRB26B64778
मानवत ः तहसीलदारांना निवेदन देताना केकरजवळा मंडळातील शेतकरी.
-------------
पिकांचे तातडीने पंचनामे
करून आर्थिक मदत द्या
केकरजवळा मंडळातील शेतकऱ्यांची तहसीलदारांकडे मागणी
मानवत, ता.६ (बातमीदार): ३४ ते ३५ दिवसांपासून पावसाने दिर्घ दडी मारल्याने केकरजवळा महसूल मंडळातील शेतकऱ्यांची पीके डोळ्यांसमोर करपण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय गाठून प्रशासनास निवेदन दिले.
केकरजवळा मंडळातील सोयाबीन, कापूस, तूर आणि हळद या पिकांना पावसाच्या प्रदीर्घ खंडाचा मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून अनेक ठिकाणी पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. वर्षभराची मेहनत, शेतीवर केलेला खर्च, घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी अक्षरशः आर्थिक विवंचनेत सापडला आहे. प्रत्यक्ष पंचनामे, प्रत्यक्ष नुकसानभरपाई, तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी ठाम भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. पावसाने पाठ फिरवल्याने मोठे नुकसान झाले असून शासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने केकरजवळा मंडळातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे सुरू करावेत, पात्र शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली.यावेळी ज्ञानेश्वर धोपटे, रितेश कदम, विष्णू हारके, विनायक वरखडे, शेषराव धोपटे, गजानन लाडाने, गणेश कौसले, योगेश धोपटे, गजानन धोपटे, नागेश आळसे, गणेश धोपटे, देविदास चव्हाण, आशिष लाडाने, मारोती साठे, सुरेश धोपटे, अमोल धोपटे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
---------------