Aurangabad|कुटुंबाचा आधार असलेल्या कलाबाईचा मृत्यूशी झुंज अयशस्वी

कुटुंबावर अनेक संकट आलेली असताना आपल्या मनगटाच्या जोरावर शेती व्यवसाय करून कुंटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या घरातील कर्त्या शेतकरी महिलेचा अखेर दुर्देवी अंत....
Woman Farmer
Woman Farmeresakal

शेंदूरवादा (जि.औरंगाबाद) : कुटुंबावर अनेक संकट आलेली असताना आपल्या मनगटाच्या जोरावर शेती व्यवसाय करून कुंटुंबाचा उदरनिर्वाह चालवणाऱ्या घरातील कर्त्या शेतकरी महिलेचा (Woman Farmer) अखेर दुर्देवी अंत झाल्याची घटना गंगापूर (Gangapur) तालुक्यातील गुरूधानोरा येथे घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या मृत्युने दोन अल्पवयीन मुले आईविना पोरकी झाली, तर आजारी असलेल्या आजी व अंथरूणावरील वडिलांचे काय? हा प्रश्न लहान मुलासमोर आहे. या विषयी अधिक माहिती असे की, गुरूधानोरा (ता.गंगापूर) येथे भाऊसाहेब आनंदा भावले यांचे कुटुंब वास्तव्यास असून दोन अडीच एकरावर कसा तरी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. घरातील कर्ते पुरुष  भाऊसाहेब भावले हे गेल्या तीन-चार वर्षांपासून हत्ती रोगाने घरात अंथरूणावर पडून आहे. घरात वृद्ध आई रूखमणबाई तर दोन मुले व दोन मुली असून मुलीचे लग्न झाले असल्याने त्या सासरी आहे. (Aurangabad)

Woman Farmer
Aurangabad Crime|औरंगाबादेत डॉक्टरावर चाकूने हल्ला,हल्लेखोर पसार

मुले लहान असल्याने पत्नी कलाबाई भाऊसाहेब भावले यांनी कुटुंब उदरनिर्वाह चालविण्याची जबाबदारी घेऊन शेती करू लागल्या. घरच्या शेती उत्पादनात कुटुंबाची आर्थिक घडी बसत नसल्याने त्यांनी काही शेतकऱ्यांची शेती बटाईने करणे सुरू केले. घर संसाराचा गडा कसाबसा चालवत असताना शनिवारी (ता.तीन) शेतातील कापूस ,मिरची घेत बैलगाडी घेऊन शेतावरून घरी येत असतांना रस्त्यातील खड्डयात कलाबाईची बैलगाडी आदळताच त्या गाडीच्या चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाल्या. सदरची माहीती मिळताच गावकऱ्यांच्या मदतीने मुलांनी गंभीर अवस्थेतील आईला खासगी दवाखान्यात दाखल केले. त्यात सोमवारी(ता.पाच) त्यांच्या सुखी संसारावर काळाने झडप मारली अन् मृत्यूशी सुरू असलेली झुंज अयशस्वी ठरली. त्यातच कलाबाईचा मृत्यु झाला. आता वडिलासह वृध्द आजीचे काय? या प्रश्नाने ती मुले आजही विचाराधीन आहे. कुटुंबावर आलेल्या अनेक संकटाशी दोन हात करणाऱ्या कलाबाई मात्र या काळरुपी संकटाने हिरवल्याने या कुटुंबावर मोठे संकट उभे ठाकले असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com