Hingoli Summer Heat: उन्हाळ्यात थंड पाणी प्यायचे असल्यास मातीच्या माठांची गर्दी वाढली

Summer Heat Drives Demand for Clay Pots in Kalmnuri: कळमनुरीच्या बाजारात उन्हाळ्याच्या दिवसात मातीच्या माठांची मोठी आवक झाली आहे. स्थानिक तसेच बैतुल, परभणी व वाशिम येथून आलेले माठ नागरिकांना नैसर्गिक पाणी देण्याच्या उद्देशाने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. फ्रीजच्या पाण्यापेक्षा माठातील पाणी आरोग्यास हितकारक असून थंड राहते, त्यामुळे उन्हाळ्यात माठांची मागणी प्रचंड वाढली आहे.
Hingoli Summer Heat

Hingoli Summer Heat

esakal

Updated on

कळमनुरी: मार्च महिन्याच्या सुरवातीपासूनच सूर्याने आग ओकायला सुरवात केली असून, हिंगोली जिल्ह्यासह कळमनुरी तालुक्यात उन्हाचा पारा झपाट्याने वाढत आहे. वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाहीलाही होत असताना, नागरिक आता कृत्रिम शीतपेयांपेक्षा नैसर्गिक पर्यायांकडे वळताना दिसत आहेत.

कळमनुरी येथील आठवडे बाजारात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर मातीच्या माठांची मोठी आवक झाली असून, थंड पाण्यासाठी नागरिकांची माठ खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com