
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कमवा आणि शिका योजनेच्या विद्यार्थ्यांनी दहा हजार ऑफिस फोल्डर (पॅड) आणि सहा हजार फाइल्स तयार करून त्याचा विद्यापीठ प्रशासनाला पुरवठा केला आहे. तर, तयार केलेल्या चार हजार पैकी दोन हजार सॅनिटरी नॅपकिन विविध विभागांत पुरवण्यात आल्या आहेत. मागणीनुसार या साहित्याचा पुरवठा कमवा शिका विभागाकडून केला जात आहे.