
Seven Accused Brutally Murder 24-Year-Old Shubham Rajput in Nagad Over Suspicion of Visiting a Woman's House.
Sakal
कन्नड : तालुक्यातील नागद येथे एका २४ वर्षीय तरुणांचा सात आरोपींनी एकत्र येऊन धारदार शस्त्राने सपासप वार करुन खुन केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता.१४) रोजी रात्री साठे आठ वाजेच्यासुमारास घडली. शुभम रणविरसिंग राजपूत (२४, रा.नागद) असे मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी (ता.१५) रोजी सकाळी सात आरोपींच्या विरुद्ध कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. व चौकशीसाठी पाच संशयीत आरोपींना ताब्यात घेतले आहे.