A sugarcane-loaded tractor trolley struggles to negotiate a narrow turn on the Kannad-Vaijapur road near Vita Phata.
esakal
कन्नड, : तालुक्यातील औराळा फाटा व विटा फाटा येथे कन्नड-वैजापूर राज्य मार्गाला जोडणारी वळणे अवजड वाहनांसाठी धोकादायक ठरत आहेत. उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली या वळणांवरून वळविताना ट्रॅक्टरचा पुढील भाग उचलला जात असल्याचे चित्र आहे. अरुंद वळणांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, संभाव्य अपघात टाळण्यासाठी या वळणांचे रुंदीकरण करण्याची मागणी होत आहे.