Tapaleshwar Temple: तपालेश्वर महादेव मंदिर; प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी स्थापन केलेल्या शिवलिंगाची रामायणात नोंद
Hemadpanti Architecture: पळशी येथील तपालेश्वर महादेव मंदिर हे प्रभू श्रीरामांच्या वनवास प्रवासाशी संबंधित पौराणिक स्थळ आहे. हेमाडपंती शैलीतील हे प्राचीन मंदिर भक्तांना अध्यात्मिक शांतता आणि मनोकामना पूर्णतेचा अनुभव देते.
पळशी (ता. सिल्लोड): येथील ‘तपालेश्वर’ हे प्राचीन महादेव मंदिर असून या मंदिराला पौराणिक महत्त्व प्राप्त आहे. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र वनवासात होते. तेव्हा ते या मार्गाने पंचवटीकडे (नाशिक) प्रवास करत होते, त्यांनी या ठिकाणी मुक्काम केला होता.