कर्णपुरा यात्रेसाठी ३५६ पोलिसांचा बंदोबस्त

कर्णपुरा यात्रेसाठी ३५६ पोलिसांचा बंदोबस्त
Published on: 
कर्णपुरा यात्रेत ३५६ पोलिसांचा बंदोबस्त --- २५० पुरुष, ७५ महिला अंमलदारांसह एसआरपीएफची एक तुकडी तैनात ------------------------------------ छत्रपती संभाजीनगर, ता. १० : कर्णपुरा यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शहर पोलिसांनी व्यापक बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यात्रेच्या सुरक्षिततेसाठी शहरातील विविध पोलिस ठाण्यांमधील अधिकारी व अंमलदारांसह राज्य राखीव पोलिस दलाची (एसआरपीएफ) एक कंपनी प्लाटून तैनात केली. यामध्ये २५० पुरुष आणि ७५ महिला अंमलदारांचा समावेश आहे. नवरात्रोत्सवात कर्णपुरा येथे देवीच्या दर्शनासाठी जिल्ह्यासह मराठवाड्यातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण व भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलिस बंदोबस्ताचे नियोजन छावणी विभागाकडून करण्यात आले आहे. कर्णपुरा यात्रा बंदोबस्ताची संपूर्ण देखरेख पोलिस उपायुक्त परिमंडळ-२ पंकज अतुलकर यांच्यावर सोपवली आहे. सहायक पोलिस आयुक्त मजहर सय्यद हे बंदोबस्ताचे प्रभारी अधिकारी तर सहायक पोलिस निरीक्षक विवेक जाधव हे सहप्रभारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. शहरातील सिटी चौक, क्रांती चौक, बेगमपुरा, वेदांतनगर, छावणी, वाळूज, एम. वाळूज, दौलताबाद, सिडको, एमआयडीसी सिडको, जिन्सी, मुकुंदवाडी, पुंडलिकनगर, जवाहरनगर, उस्मानपुरा आणि सातारा यांसह विविध पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी तैनात केले आहे. ---- मुख्यालयातीलही अतिरिक्त कुमक बंदोबस्तासाठी पोलिस मुख्यालयातूनही ३५ पुरुष आणि २४ महिला अंमलदार तैनात केले आहेत. याशिवाय नियंत्रण कक्ष आणि गुन्हे शाखेतील अंमलदारांकडे जबाबदारी दिली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या डीबी पथकातील एक अंमलदार साध्या गणवेशात नियुक्त केला आहे. ---- पुलाखालून जाणारे मार्ग वाहतुकीसाठी बंद भगवान महावीर चौक ते पंचवटी चौक उड्डाणपुलाखालून जाणारा व येणारा मार्ग, रेल्वे स्टेशनकडून पंचवटी चौकाकडे पुलाखालून जाणारा मार्ग नवरात्रोत्सवात वाहतुकीसाठी बंद असेल. तसेच लोखंडी पूल ते पंचवटी चौक आणि कोकणवाडी चौक ते पंचवटी चौकाकडे येणारा व जाणारा मार्गही बंद असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com