ABD26J80621 ((((ओव्हरसेट)))
((((फोटो ओळ))) सिडको ः ‘सकाळ’च्या वृत्तानंतर केटली गार्डन रस्त्यावर चेंबरची उंची वाढविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
-------
केटली गार्डन परिसरात चेंबरची वाढवली उंची
-------
‘सकाळ’च्या वृत्तानंतर प्रशासनाला जाग; अपघाताचा धोका टळणार
-------
सिडको, ता. २ : एन-४ भागातील केटली गार्डन परिसरातील ड्रेनेज चेंबरच्या ढाप्यांची उंची रस्त्यापेक्षा कमी असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. रस्त्यावरून ये-जा करताना दुचाकीस्वार तसेच पादचाऱ्यांना या चेंबरमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला होता. विशेषतः रात्रीच्या वेळी चेंबर दिसत नसल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात होती. या गंभीर समस्येबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध करताच महापालिका प्रशासनाने चेंबरची उंची वाढवण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
सिडको एन-४ परिसरातील केटली गार्डन भाग अत्यंत वर्दळीचा आहे. या रस्त्यावरील ड्रेनेज चेंबर खड्ड्यात गेल्याने त्यात पाणी साचत होते. त्यामुळे वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज येत नसे. चेंबरमध्ये चाक आदळून दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटण्याची आणि अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नव्हती. मात्र, ‘सकाळ’मध्ये वृत्त प्रकाशित होताच प्रशासनाला जाग आली असून चेंबरची उंची रस्त्याच्या समपातळीवर आणण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.