Mango Season : छत्रपती संभाजीनगरमधील आंबा बाजारात सध्या मोठ्या प्रमाणात आवक सुरू असून, केशरचा हंगाम सुरू झाला आहे. हापूस शेवटच्या टप्प्यात असून, दर कमी झाले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : मागील आठवडाभरापासून जिल्हाभरात वादळी वाऱ्याची परिस्थिती असली तरी आंबा मार्केट चांगलेच सजलेले आहे. सध्या शहरातील आंबे बाजारात विविध प्रकारच्या आंब्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे.