छत्रपती संभाजीनगर : शिवसेना (यूबीटी) नेते चंद्रकांत खैरे आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यातील ‘सख्ख्य’ सर्वांना ठाऊक आहे. परंतु, रविवारी (ता.२५) या दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे तोंडभरून कौतुक केले. .दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर ‘कौतुकांचा अवकाळी पाऊस’च झाल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे हे चित्र पाहून पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून टाळ्याने जोरदार दाद देण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पूर्वतयारीसाठी शिवसेना (यूबीटी) पक्षाच्या वतीने रविवारी आयएमए हॉल येथे महापालिका क्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचा मेळावा घेण्यात आला. .या मेळाव्यात शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी दानवे यांनी ‘‘खैरे हे खासदार असताना ३७४ कोटींची भूमिगत गटार योजना त्यांनी आणली. त्यामुळे आता पावसाळ्यातही लोकांच्या घरात पाणी जात नाही. .ड्रेनेजचे पाणी थेट एसटीपीपर्यंत जाते’’, अशा शब्दांत त्यांनी खैरे यांचे कौतुक केले. यानंतर मार्गदर्शनासाठी आलेल्या खैरे यांनी दानवेंचा उल्लेख ‘दादा’ असा केला. यावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. नेहमी एकमेकांवर टीका-टिपण्णी करणारे हे दोन्ही नेते एकमेकांचे गोडवे गात असताना पाहून उपस्थित कार्यकर्त्यांनीही या कौतुकाच्या अवकाळी पावसाला टाळ्यांची जोरदार दाद दिली..निवडणूक प्रभागनिहाय, आमच्याकडे १०९ उमेदवारशहरातील महापालिका निवडणूक ही प्रभागनिहाय होणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाशी बोललो. पूर्वी प्रमाणेच ११५ वॉर्ड राहतील, चार वॉर्डांचा एक प्रभाग होईल. सध्या आपल्याकडे १०९ वॉर्डांत उमेदवार असल्याचा दावाही यावेळी दानवे यांनी केला..Ghati Hospital : रस्त्यात झालेली प्रसूती घाटी रुग्णालयास मान्य; दोषींवर कारवाईसाठी रुग्णाने तक्रार द्यावी, प्रशासनाकडून अजब सल्ला.नेत्यांचे दाद मिळणारे संवाददानवे ः (मुंबईच्या नेत्यांना उद्देशून) निवडणुकीत तुम्हाला यायची गरज नाही. खैरे आणि मी दोघेच विरोधकांना निपटू.खैरे ः दानवेंनी सांगितल्याप्रमाणे आम्ही काय करतो पाहा! कुणी दानवे किंवा खैरेंचा समर्थक नाही, आपण उद्धव ठाकरे यांचे समर्थक. रिक्त पदांवर कुणाला नियुक्ती द्यायची ते तुम्हीच ठरवा, मी आणि दानवे दोघे मान्य करू.देसाई ः खैरे यांनीच मला घडवले असे दानवे नेहमी म्हणतात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.