खरीप २०२६-२७ च्या पीक कापणी प्रयोगांच्या ऑनलाईन नोंदी वेळेत पूर्ण करा; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे निर्देश

खरीप २०२६-२७ च्या पीक कापणी प्रयोगांच्या ऑनलाईन नोंदी वेळेत पूर्ण करा; जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे निर्देश
Published on
खरीप पीक कापणी प्रयोगांच्या नोंदी वेळेत पूर्ण करा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे निर्देश; विम्याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासन सरसावले सकाळ वृत्तसेवा बीड, ता. २१ ः प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम २०२६-२७ मधील पीक कापणी प्रयोगांच्या ऑनलाइन नोंदी विहित मुदतीत व वेळेत पूर्ण करण्याचे सक्त निर्देश बीडचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत. चालू हंगामात बळिराजाला पीक विम्याचा लाभ वेळेत आणि सुरळीत मिळवून देण्यासाठी पीक कापणी प्रयोगांचे अचूक आकडे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात पीक कापणी प्रयोगांची सद्यस्थिती आणि तालुकावार कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील बीड, अंबाजोगाई, आष्टी, गेवराई, धारूर, पाटोदा, शिरूर आणि वडवणी आदी सर्व तालुक्यांमधील सोयाबीन, मूग, कापूस, बाजरी आणि तूर या पिकांच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील पीक कापणी प्रयोगांच्या ऑनलाईन प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. ज्या तालुक्यांमध्ये प्रयोग प्रलंबित आहेत, तेथील काम प्राधान्याने शंभर टक्के पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासनाला दिल्या. मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी जॉन्सन म्हणाले की, ज्या गावांमध्ये नो क्रॉप रिपोर्ट किंवा इतर तांत्रिक बाबींमुळे कामे अडली आहेत, त्यांनी सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी. यामुळे शेतकऱ्यांच्या विमा दाव्यांवर योग्य कार्यवाही करणे सोयीचे होईल. महसूल, कृषी आणि पंचायत या तिन्ही विभागांनी परस्परांशी योग्य समन्वय ठेवून हे काम अधिक गतिमान करावे आणि उर्वरित प्रलंबित नोंदी मुदतीत पूर्ण कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी प्रत्यक्ष तसेच दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हीडिओ कॉन्फरन्सिंग) उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com