Bidkin Crime : बिडकीन येथील बसस्थानक डेपो मध्ये हत्या; बांधकाम कामगारात झालेला वाद गेला शिगेला
Crime News : बिडकीन बसस्थानक डेपो परिसरात दारु पाजण्यावरून आणि आईवर शिवीगाळ केल्याच्या वादातून अमोल धर्मे याने मच्छिंद्र तोगे याला गंभीर मारहाण केली. उपचारादरम्यान मच्छिंद्र याचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बिडकीन : शहरातील बसस्थानक डेपो परिसरात (ता.२२) रोजी संध्याकाळी १९:३० वाजता दारु पाजण्याचे व आई वरुन शिवीगाळ केल्याचे कारणावरुन दोन जणात हाणामारी झाली असुन यामध्ये एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.