किनवट बसथांब्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच;

किनवट बसथांब्यावर दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच;
Published on: 
ABD26J83268 किनवट ः येथील बसथांब्यावर पडलेला दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच. --- किनवट बसथांब्यावर दारूच्या बाटल्यांचा खच --- प्रवाशांना अस्वच्छतेचा त्रास; संबंधित विभागाच्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांत नाराजी ----- शुभम शिंदे गोकुंदा, ता.१६ : किनवट शहरातील ढासळलेल्या सार्वजनिक व्यवस्थेचे आणखी एक चित्र सोमवारी बसस्थानकासमोर पाहायला मिळाले. प्रवाशांना बसची प्रतीक्षा करण्यासाठी उभारण्यात आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बसथांब्यावर अज्ञात व्यक्तींनी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच टाकल्याचे निदर्शनास आले. प्रवाशांच्या सोयीसाठी उभारलेल्या या ठिकाणाची दुरवस्था पाहता सार्वजनिक सुविधांच्या देखभालीची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात अवैध धंदे आणि असामाजिक प्रकार सुरू असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या आहेत. मात्र, आता थेट बसथांब्यावरच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच आढळून आल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधोरेखित झाले आहे. बसची वाट पाहण्यासाठी येणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि इतर प्रवाशांना अशा अस्वच्छ वातावरणाचा सामना करावा लागत आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, सुरक्षितता आणि देखभाल राखण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणांची असताना अशा प्रकारांकडे दुर्लक्ष का होत आहे? बसथांब्यावर दारूच्या बाटल्या येतातच कशा आणि त्या हटविण्यासाठी संबंधित विभागाकडून कोणती कारवाई केली जाणार, असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.