Kirit Somaiya : दोन लाख बांगलादेशींचे जन्म दाखल्यांसाठी अर्ज; किरीट सोमय्या , छत्रपती संभाजीनगर, सिल्लोडचाही समावेश
Chh. Sambhajinagar : भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी सांगितले की, राज्यामध्ये २ लाख बांगलादेशी नागरिकांनी जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १०,०००, सिल्लोडमध्ये ४,७३५ बांगलादेशी दाखल झाले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला.
सिल्लोड : राज्यामध्ये दोन लाख बांगलादेशी (रोहिंगे) नागरिकांनी जन्म प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये दहा हजार, तर सिल्लोडमध्ये चार हजार ७३५ बांगलादेशी दाखल झाल्याचा आरोप भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी केला.