Abdul Sattar : भा.ज.प. नेते किरीट सोमय्या यांनी सिल्लोड तालुक्यात सर्वाधिक बांगलादेशी नागरिक असल्याचा दावा केला असून, सिल्लोडमध्ये पाच हजार बांगलादेशी असल्याचा आरोप केला. सोमय्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत माहिती दिली आणि आरोप केले.
छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात १० हजारांवर बांगलादेशी नागरिक असून, यातील सर्वाधिक सुमारे पाच हजार एकट्या सिल्लोड तालुक्यात असल्याचा खळबळजनक दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.