के.के.एम. महाविद्यालयात
गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
मानवत ता.३ (बातमीदार)ः जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या प्रमुख उपस्थितीत के.के.एम. महाविद्यालयात विविध परीक्षेतील यशस्वी विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पन्नालालजी चांडक सभागृहात झाला. यावेळी ३५ गुणवंत विद्यार्थ्यांना एकूण ५५ हजार ५५५ रुपयांची रोख पारितोषिके, प्रमाणपत्रे व पुस्तक संच देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांनी जीवनाचे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, तर यश निश्चित मिळते. मेहनत, शिस्त, सातत्य आणि सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडवावे, असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांनी केले. पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमारजी कत्रुवार अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्ष अनिलराव नखाते, सहसचिव विजयकुमार दलाल, सदस्य दिलीपराव हिबारे, दिगंबरराव बारटक्के, प्राचार्य डॉ. भास्कर मुंडे, उपप्राचार्य डॉ. के. जी. हुगे, पर्यवेक्षक एम. एम. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. मुंडे यांनी प्रास्ताविक केले. गुणवंतांना प्रोत्साहन देतानाच इतर विद्यार्थ्यांतही स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे हा उपक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय समारोपात कत्रुवार यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. डॉ. चेतनकुमार व्यास यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जाधव विनायक व विनोद हिबारे यांनी पारितोषिकांचे वाचन केले. डॉ. पंकज चलिकवार यांनी आभार मानले. प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.