गुडघेदुखी थांबवण्यासाठी व झिजलेल्या गुडघ्यांसाठी

गुडघेदुखी थांबवण्यासाठी व झिजलेल्या गुडघ्यांसाठी
Published on: 
गुडघेदुखी थांबवण्यासाठी व झिजलेल्या गुडघ्यांसाठी उपचारांची Dr. My Care Clinic ची नवी आशा - KRT उपचार सोबत. गुडघेदुखीमुळे रोजच्या आनंदाला विराम लागतोय? तुमच्या पावलांना पुन्हा आत्मविश्वास देण्यासाठी आजच योग्य उपचार जाणून घ्या! सकाळी उठल्यावर पहिलं पाऊल टाकतानाच गुडघ्यात कळ येते... खुर्चीतून उठताना हाताचा आधार घ्यावा लागतो... जिने उतरताना ‘‘पाय तो सोडणार तर नाही ना?’’ अशी काळजी वाटते... तुम्हालाही हे अनुभव येतात का? गुडघेदुखी म्हणजे फक्त एका सांध्याचं दुखणं नाही. ती घरातली कामं, बाहेर फिरणं, कुटुंबासोबत वेळ घालवणं आणि स्वतःची कामं स्वतः करण्याच्या आनंदावर परिणाम करू शकते. पूर्वी सहज होणाऱ्या गोष्टी आता जपून कराव्या लागतात. बाजारातून सामान आणणं, स्वयंपाक करताना उभं राहणं, मंदिराच्या पायऱ्या चढणं किंवा बसमध्ये चढणंही कठीण वाटू शकतं. खाली बसून जेवणं, मांडी घालणं आणि जमिनीवरून उठणं टाळावं लागतं. काहींना थोडं चालल्यावर घ्यावी लागते; तर काहींना घरातही आधाराची गरज भासते. ‘तुम्ही जा, मला चालताना त्रास होतो,’ असं म्हणताना दुखतो तो फक्त गुडघा नाही- मनही दुखतं. गुडघेदुखी फक्त वेदना नाही... तुमच्या गुडघ्यातील cartilage/कूर्चा ( गादी) झिजत असल्याचा इशारा असू शकतो! तुमच्या गुडघ्यातील Cartilage (गादी) हा हाडांच्या टोकांना संरक्षण देणारा महत्त्वाचा घटक आहे. तो सांध्याच्या हालचालीदरम्यान घर्षण कमी करण्यास आणि हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत करतो. Cartilage (गादी) ची झीज वाढत गेल्यास गुडघ्यात वेदना, कडकपणा, सूज आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. गंभीर अवस्थेत सांध्यातील झीज मोठ्या प्रमाणात वाढल्यास डॉक्टरांकडून शस्त्रक्रियेसह विविध उपचार पर्यायांचा विचार केला जाऊ शकतो.. म्हणूनच प्रश्न फक्त ‘‘गुडघा किती दुखतो?’’ हा नसून ‘‘गुडघ्याच्या आत Cartilage/ कूर्चा आहे. (गादी) ची स्थिती काय आहे?’’ हादेखील महत्त्वाचा गुडघेदुखीकडे दुर्लक्ष केल्यास काय होऊ शकते? तुमच्या गुडघ्याच्या समस्येकडे वेळेत लक्ष दिले नाही तर वेदना आणि हालचालींची समस्या वाढू शकते. चालणे हळूहळू कमी होऊ शकते : सुरुवातीला फक्त जास्त चालल्यावर गुडघा दुखतो. नंतर थोडे अंतर चालल्यानंतरही वेदना होऊ शकतात. शेवटी रोजच्या हालचालींसाठी आधाराची गरज भासू शकते. उठणे-बसणे त्रासदायक होऊ शकते : खुर्चीतून उठणे, जमिनीवर बसणे, शौचालय वापरणे किंवा प्रार्थनेसाठी बसणे-उठणे यांसारख्या साध्या गोष्टीही कठीण होऊ शकतात. जिने चढणे-उतरणे कठीण होऊ शकते : जिने चढताना किंवा उतरताना गुडघ्यावर मोठा भार येतो. त्यामुळे वाढलेली गुडघेदुखी दैनंदिन जीवनातील स्वावलंबन कमी करू शकते. हालचाल कमी झाल्याने शरीराची ताकद कमी होऊ शकते : वेदनेमुळे व्यक्ती चालणे आणि व्यायाम कमी करते. त्यामुळे पायाभोवतीचे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि हालचाली आणखी कठीण होण्याचे चक्र निर्माण होऊ शकते. जीवनशैलीवर परिणाम होऊ शकतो : गुडघेदुखीमुळे बाहेर जाणे, प्रवास करणे, बाजारात जाणे, सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे किंवा आवडीच्या गोष्टी करणे कमी होऊ शकते. म्हणजेच गुडघेदुखी फक्त गुडघ्यापुरती राहत नाही, ती तुमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकते. डॉ. मायकेअरची KRT Therapy आयुर्वेदिक उपचारांच सर्वोत्तम! --- गुडघ्याच्या गादीसाठी Dr. MyCare मध्ये KRT ही गुडघ्याच्या समस्यांसाठी रुग्णाच्या स्थितीनुसार नियोजित केलेली उपचारपद्धती आहे. येथे गुडघेदुखीच्या उपचारपद्धतीमध्ये केवळ वेदना कमी करण्याऐवजी रुग्णाची एकूण अवस्था समजून घेऊन उपचार नियोजन करण्यावर भर दिला जातो. कूर्चा (गादी) च्या नैसर्गिक पुनर्निर्मिती प्रक्रियेस आधार भेटतो, कूर्चेची पुढील झीज कमी करण्यास उपयुक्त मदत होते, गुडघ्याची योग्य हालचाल, शरीराचे वजन, आहार आणि जीवनशैली याकडे लक्ष देऊन कूर्च्यावर येणारा अनावश्यक ताण कमी करण्यास मदत केली जाते. गुडघ्यातील वेदना कमी होता, गुडघ्याची हालचाल सुधारण्यास मदत होते. सकाळी किंवा बराच वेळ बसल्यानंतर जाणवणारा गुडघ्याचा कडकपणा कमी होतो, प्रत्येक रुग्णाची गुडघ्याची अवस्था वेगळी असल्यामुळे उपचार, आहार, व्यायाम आणि पुढील मार्गदर्शन रुग्णाच्या स्थितीनुसार ठरवले जाते. गुडघ्यातील झिजलेल्या कूर्चेच्या नैसर्गिक दुरुस्ती प्रक्रियेस पोषक वातावरण निर्माण करण्यावर उपचारपद्धतीत भर दिला जातो. KRT मध्ये रुग्णाच्या गरजेनुसार लक्ष दिले जाते : गुडघेदुखीचे व्यवस्थापन व दैनंदिन हालचालींमध्ये होणारी वेदना व अस्वस्थता कमी करण्यासाठी उपचार नियोजन व लक्ष दिले जाते. चालण्याची क्षमता रुग्णाला शक्य तितक्या आरामदायी पद्धतीने हालचाल करण्यास मदत होते. गुडघ्याची हालचाल, कडकपणा आणि हालचालीतील अडथळे कमी करण्यासाठी योग्य उपचार व मार्गदर्शन दिले जाते. वेदना कमी होणं, गुडघा अधिक सहज वाकवता येणं, चालताना कमी त्रास होणं आणि स्वतःची कामं अधिक आरामात करता येणं. खुर्चीतून उठताना कमी आधार लागणं, अधिक अंतर चालता येणं आणि जिने अधिक सुरक्षितपणे वापरता येणं या सुधारणा - रोजच्या आयुष्यात मोठा दिलासा देऊ शकतात. आमच्या थेरपीचे असे अनेक फायदे आहेत. गुडघ्याभोवतीचे स्नायू मजबूत करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेले योग्य व्यायाम नियमित सरावही महत्त्वाचे असतात. --- ‘‘आणखी थोडे दिवस पाहू... ’ म्हणताना तुमची आवडती कामं मागे पडत आहेत का? गुडघेदुखीमुळे चालणं, झोप किंवा रोजची कामं अडत असतील, तर तपासणी पुढे ढकलू नका. तुमच्या वेदना समजून घेण्यासाठी आणि योग्य उपचार ठरवण्यासाठी आजच पहिलं पाऊल उचला. Dr. MyCare ला आजच फोन करा आणि KRT साठी तपासणीची वेळ ठरवा. जुने X-ray, reports आणि सुरू असलेल्या औषधांची माहिती सोबत आणा. थेरपी तुमच्यासाठी योग्य असल्यास, तिचे फायदे व मर्यादा समजून घेऊन उपचार सुरू करण्याचा निर्णय घ्या. तुमची इच्छा पुन्हा सहज चालण्याची आहे. सुरुवात तुमच्या गुडघ्यांची योग्य तपासणी करण्यापासून करा. Dr. MyCare Holistic Super Speciality Clinic रेणुका माता मंदिर कमान, सातार देवळाई परिसर, छ. संभाजीनगर संपर्क: ९००५६६९००५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com