क्लनिकिच्या थेरपीमुळे आता गुडघेदुखी कायमची बारी होते !

क्लनिकिच्या थेरपीमुळे आता गुडघेदुखी कायमची बारी होते !
Published on: 
Dr. MyCare क्लिनिकच्या थेरपीमुळे आता गुडघेदुखी कायमची बारी होते! डॉ. मायकेअर होलिस्टिक सुपर स्पेशालिटी क्लिनिकच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आज आपल्या समाजात ५० वर्षांनंतर अनेक जण गुडघेदुखीने त्रस्त आहेत. पण, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे बहुतेक लोक सुरवातीची लक्षणे ओळखत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. ‘वय झालं आहे, आता दुखणारच’, ‘थोडी वेदना आहे, नंतर बघू’, ‘गोळी घेतली की बरं वाटतं’ अशा विचारांमुळे अनेक रुग्ण वर्षानुवर्षे त्रास सहन करत राहतात. पण, लक्षात ठेवा, गुडघेदुखी ही शरीराने दिलेली एक महत्त्वाची सूचना असते. योग्यवेळी योग्य उपचार घेतले, तर पुढील अनेक वर्षे आपण आनंदाने, स्वावलंबीपणे आणि आत्मविश्वासाने जगू शकतो. सुरवातीला गुडघेदुखी फार मोठी वाटत नाही. सकाळी उठल्यावर गुडघा आखडल्यासारखा वाटतो. काही वेळ चालल्यानंतर थोडा आराम मिळतो. जिने चढताना किंवा उतरताना गुडघा दुखतो. जमिनीवर बसल्यानंतर उठण्यासाठी आधार घ्यावा लागतो. जास्त वेळ उभे राहिल्यावर किंवा चालल्यानंतर गुडघा जड वाटतो. गुडघ्यात कटकट आवाज येतो. काहीवेळा सूजही दिसते. अनेक रुग्ण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. पण, हीच वेळ उपचार सुरू करण्याची सर्वात योग्य वेळ असते. आमच्या दवाखान्यात एक ५८ वर्षांचे काका आले होते. त्यांना रोज सकाळी फिरायला जाण्याची सवय होती. सुरवातीला चालताना थोडी वेदना होत होती. त्यांनी ती साधी गोष्ट समजून दुर्लक्ष केले. काही महिन्यांनी त्यांना चालण्याचे अंतर कमी करावे लागले. नंतर जिने चढणे कठीण झाले. शेवटी एवढी परिस्थिती आली, की बाजारात जाणे, मित्रांना भेटणे आणि नातवंडांसोबत खेळणेही त्यांनी बंद केले. त्यांचे आयुष्य फक्त घर आणि खुर्चीइतकेच मर्यादित झाले. एका ६३ वर्षांच्या आजींचीही अशीच कथा होती. त्यांना रोज देवपूजेसाठी खाली बसायला आवडायचे. पण गुडघेदुखीमुळे खाली बसणे आणि पुन्हा उठणे अशक्य झाले. प्रत्येक वेळी कोणीतरी हात द्यावा लागायचा. त्यांना स्वतःपेक्षा दुसऱ्यावर अवलंबून राहावे लागल्याची जास्त वेदना होत होती. गुडघेदुखीमुळे फक्त चालणे थांबत नाही, तर माणसाचा आत्मविश्वास, आनंद आणि स्वाभिमानही कमी होऊ लागतो. गुडघेदुखीची अनेक कारणे असू शकतात. वाढते वय, सांध्यांची झीज, वाढलेले वजन, व्यायामाचा अभाव, चुकीची बसण्याची पद्धत, जुन्या दुखापती, शरीरातील वातदोषाचे असंतुलन किंवा सांध्यांची कमकुवतता यामुळे ही समस्या वाढू शकते. सुरवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास वेदना दिवसेंदिवस वाढत जाते. चालणे कमी होते. शरीराची हालचाल कमी झाल्यामुळे वजन वाढते. पायातील स्नायू कमकुवत होतात. अनेकांना काठी किंवा दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो. काही जण तर बाहेर जाणेच बंद करतात. घरातील लग्न समारंभ, सहली, मंदिर, बाग, नातवंडांसोबतचे खेळ या सर्व आनंदापासून ते दूर जाऊ लागतात. म्हणूनच आम्ही प्रत्येक रुग्णाला एकच सांगतो, गुडघेदुखीची वाट पाहू नका, कारण ती थांबत नाही... ती हळूहळू वाढतच जाते. आज जी वेदना फक्त जिने चढताना जाणवते, ती काही महिन्यांनी साधे चालणेही कठीण करू शकते. आज तुम्ही स्वतः चालत आहात, पण वेळेवर उपचार न घेतल्यास उद्या तुम्हाला दुसऱ्याचा हात धरावा लागू शकतो. त्यामुळे योग्यवेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. डॉ. मायकेअर होलिस्टिक सुपर स्पेशालिटी क्लिनिकमध्ये गुडघेदुखीसाठी KRT (Knee Revive Therapy) ही आयुर्वेदावर आधारित विशेष उपचार पद्धती उपलब्ध आहे. प्रत्येक रुग्णाची प्रकृती, आजाराची अवस्था आणि दैनंदिन जीवनातील अडचणी समजून वैयक्तिक उपचार योजना तयार केली जाते. आयुर्वेदाचा उद्देश फक्त वेदना कमी करणे नसून सांध्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, शरीराची नैसर्गिक कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि रुग्णाला पुन्हा सक्रिय जीवन जगण्यास मदत करण्यावर भर असतो. आमच्या उपचारानंतर अनेक रुग्णांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल अनुभवल्याचे सांगितले आहे. काही रुग्ण पुन्हा सकाळी नियमित चालू लागले. काहींना जिने चढताना पूर्वीइतका त्रास राहिला नाही. अनेक महिलांनी पुन्हा देवपूजा, स्वयंपाक आणि घरातील कामे आत्मविश्वासाने सुरू केली. अनेक आजोबा-आजी पुन्हा नातवंडांसोबत खेळू लागले, बागेत फिरू लागले आणि सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहू लागले. प्रत्येक रुग्णाचा अनुभव वेगळा असतो; परंतु योग्य तपासणी, नियमित उपचार आणि डॉक्टरांच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यास चांगले परिणाम मिळण्याची शक्यता वाढते. आज अनेक लोक फक्त वेदना कमी करणाऱ्या गोळ्या किंवा तात्पुरते उपाय करत राहतात. काही दिवस आराम मिळतो, पण मूळ समस्या तशीच राहते. त्यामुळे वारंवार वेदना परत येतात. म्हणूनच तात्पुरत्या आरामापेक्षा योग्य निदान आणि नियोजनबद्ध उपचार अधिक महत्त्वाचे आहेत. तुमचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त असेल आणि सकाळी उठताना गुडघा आखडतो, जिने चढताना वेदना होतात, चालताना गुडघ्यात कटकट आवाज येतो, बसल्यानंतर उठताना त्रास होतो किंवा चालण्याचे अंतर कमी झाले असेल, तर ही लक्षणे दुर्लक्षित करू नका. आज घेतलेला योग्य निर्णय तुमचे उद्याचे चालणे, तुमचा ‘आत्मविश्वास आणि तुमचे स्वावलंबी आयुष्य वाचवू शकतो. तुमच्या गुडघ्यांना अजून किती दिवस वेदना सहन करायला लावणार? तुमच्या नातवंडांसोबत पुन्हा आनंदाने चालायचे आहे का? पुन्हा जिने आत्मविश्वासाने चढायचे आहेत का? पुन्हा स्वतःच्या पायावर स्वाभिमानाने उभे राहायचे आहे का? जर उत्तर ‘‘होय’’ असेल, तर वाट पाहू नका. आजच डॉ. मायकेअर होलिस्टिक सुपर स्पेशालिटी क्लिनिकला भेट द्या. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुमच्या गुडघ्यांची तपासणी करून घ्या आणि योग्यवेळी योग्य आयुर्वेदिक उपचार सुरू करा. कारण, आजची योग्य सुरवातच उद्याच्या निरोगी, वेदनामुक्त आणि आनंदी आयुष्याचा पाया ठरू शकते. डॉ. मायकेअर होलिस्टिक सुपर स्पेशालिटी क्लिनिक ‘‘चालत राहा... आनंदाने जगत राहा.’’ जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणाला गुडघेदुखी, चालण्यात अडचण, जिने चढताना त्रास किंवा गुडघ्यांमुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आजच तपासणी करून योग्य उपचाराचा मार्ग निवडा संपर्क: ९००५६६९००५** **कारण... गुडघे निरोगी असतील तरच आयुष्य पुन्हा आनंदाने चालू शकता. * **

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com