कोजागरी पौर्णिमेला शहरात अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’

कोजागरी पौर्णिमेला शहरात अवजड वाहनांना ‘नो एन्ट्री’
Published on: 
कोजागरी पौर्णिमेला शहरात अवजड वाहनांना ‘नो एंट्री’ २५ ऑक्टोबरला वाहतुकीत बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन जालना, ता. १७ : कोजागरी पौर्णिमेनिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन २५ ऑक्टोबरला जालना शहरातील अवजड वाहनांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची सुरक्षितता राखण्यासाठी पोलिस अधीक्षक डॉ. विक्रम साळी यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. रविवारी (ता. २५) रात्री १२ पासून संपूर्ण एक दिवस हा बदल लागू राहणार आहे. दरम्यान, अवजड वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक नियमांचे पालन करावे आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. --- चार प्रमुख मार्गांवर बदल जालना-अंबड-वडीगोद्री-शहागड मार्ग : या मार्गाने बीडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक जालना-गोलापांगरी-छत्रपती शिवाजी महाराज चौक-अंबड मार्गे पाचोड-वडिगोद्री-शहागड मार्गाने बीडकडे वळविण्यात येणार आहे. घनसावंगी-अंबड-जालना मार्ग : घनसावंगी येथून अंबडमार्गे जालन्याकडे येणाऱ्या अवजड वाहनांसाठी सुतगिरणी चौफुली, घनसावंगी, राणीउंचेगाव फाटा तसेच अंबड परिसरातील निर्धारित पर्यायी मार्गांचा वापर करून वाहतूक वळविण्यात येणार आहे. घनसावंगी-अंबड-शहागड मार्ग : घनसावंगी येथून अंबडमार्गे शहागडकडे जाणाऱ्या अवजड वाहनांची वाहतूक सुतगिरणी चौफुली-घनसावंगी-तिर्थपुरी-सुखापुरी-वडिगोद्री मार्गे शहागडकडे वळविण्यात येणार आहे. पाचोड-अंबड-घनसावंगी मार्ग : पाचोडकडून अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणाऱ्या अवजड वाहनांसाठी अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंपाजवळील राणी उंचेगाव फाटा मार्गे घनसावंगीकडे जाण्याचा पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com