Krishna Rathod MPSC Success: ऊसतोड मजुराचा मुलगा कृष्णा राठोड याने प्रतिकूल परिस्थितीतही एमपीएससी परीक्षेत क्लास वन अधिकारी म्हणून यश मिळवले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरला आहे.
कन्नड : तालुक्यातील जामडी (घाट) तांडा येथील ऊसतोड मजुराचा मुलगा कृष्णा राठोड या मुलाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (एमपीएससी) परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत प्रथम श्रेणी (क्लास वन) पदाला गवसणी घातली आहे.