पैठण: कुंभमेळा ध्वजारोहण

पैठण: कुंभमेळा ध्वजारोहण
Published on: 
मुख्य अंकासाठी ---- पैठणमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याची जय्यत तयारी ---- शनिवारी भव्य ध्वजवंदन ः शाही स्नानाचे वेळापत्रक जाहीर ---- पैठण, ता. २८ (बातमीदार) : येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळा सोहळ्याच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर गोदावरी तीरावरील कृष्णकमळ तथा दोलेश्वर तीर्थावरील मोक्षघाट येथे शनिवारी (ता. ३१) कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ३१ फूट उंच खांबावर १५ फूट आकाराचा भव्य ध्वज फडकावण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे व पैठणचे आमदार विलास भुमरे यांच्या हस्ते हा ध्वजवंदन सोहळा होईल. याप्रसंगी नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर, सर्व नगरसेवक, प्रमुख संत-महंत, साधू-संन्यासी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती सिंहस्थ कुंभमेळा शाही स्नान आयोजन समितीने दिली आहे. विविध मठांतील साधू-संत, मुनी, त्यागी, बैरागी, मंडलेश्वर, महामंडलेश्वर, नागा साधू आणि वैष्णव साधू यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शाही स्नान पार पडणार आहे. यापूर्वी २००३ आणि २०१५ मध्ये पैठण येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत असेच भव्य शाही स्नान सोहळे यशस्वीरीत्या पार पडले होते, अशी आठवणही समितीने यावेळी करून दिली. या ऐतिहासिक सोहळ्यास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वारकरी आखाडा परिषद पैठणचे अध्यक्ष महंत बळिराम महाराज जोगस, नगराध्यक्षा विद्या भूषण कावसानकर, संयोजक पवन लोहिया यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी केले आहे. ----- असे असेल नियोजन पहिले शाही स्नान : सोमवार, २ ऑगस्ट २०२७ दुसरे शाही स्नान : मंगळवार, ३१ ऑगस्ट २०२७ तिसरे शाही स्नान : रविवार, १२ सप्टेंबर २०२७ ध्वजावतरण सोहळा : सोमवार, २४ जुलै २०२८
Marathi News Esakal
www.esakal.com