अंबड उपविभागात कुणबी जात

अंबड उपविभागात कुणबी जात
Published on
तीन हजार ७९६ कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप अंबड उपविभागातील १६ गावांतील २६७ नोंदींच्या आधारे महसूल प्रशासनाची कार्यवाही ----- अंबड, ता. १० (बातमीदार) : अंबड आणि घनसावंगी तालुक्यात कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र वितरणाची कार्यवाही महसूल प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालानुसार शोधून काढलेल्या नोंदींच्या आधारे पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. न्यायमूर्ती शिंदे समितीच्या अहवालानुसार अंबड उपविभागातील १६ गावांमध्ये कुणबी जातीच्या एकूण २६७ नोंदी आढळून आल्या आहेत. या नोंदींच्या आधारे प्रशासनाने संबंधित अर्जदारांच्या वंशावळी जुळवून आतापर्यंत तीन हजार ७९६ कुणबी जात प्रमाणपत्रांचे वितरण केले आहे. याशिवाय दोन सप्टेंबर २०२५ रोजीच्या हैदराबाद गॅझेटियरच्या शासन निर्णयानुसार आणखी १३ प्रमाणपत्रे वितरीत करण्यात आली आहेत. उपलब्ध २६७ नोंदींच्या तुलनेत सरासरी एका नोंदीच्या आधारे १४ प्रमाणपत्रे वितरीत झाली आहेत. ज्या कुटुंबांमध्ये किंवा घराण्यांमध्ये कुणबी नोंदी आढळल्या आहेत, त्यांच्या वंशजांची वंशावळ जुळवून कुळातील सदस्य तसेच पात्र नातेवाइकांना विशेष शिबिरांच्या माध्यमातून प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. दरम्यान, पारदर्शकतेसाठी १६ गावांमध्ये आढळलेल्या कुणबी नोंदींच्या याद्या संबंधित ग्रामपंचायतींच्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. विशेष शिबिरांची माहिती दवंडी, ग्रामपंचायत नोटीस बोर्ड तसेच स्थानिक व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचविली जात आहे. ----- १० ते १६ दरम्यान शिबिरे कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रे मिळवून देण्याची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी मंडळनिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ----- महसूल मंडळांमध्ये होणारी शिबिरे ११ सप्टेंबर : अंबड, घनसावंगी, शहागड, वडीगोद्री, राजणी, पानेवाडी १२ सप्टेंबर : ताडहदगाव, गोंदी, अंतरवाली, टेंभी, जांबसमर्थ १५ सप्टेंबर : सुखापुरी, रोहिलागड, तीर्थपुरी १६ सप्टेंबर : जांबखेड, धनपिंपरी, घनसावंगी ----- प्रक्रिया अधिक सुलभ शिबिरांमध्ये नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक तसेच आपले सरकार सेवा केंद्र चालक उपस्थित राहून नागरिकांना मार्गदर्शन करतील. अर्जांची पडताळणी करून पात्र नागरिकांना जात प्रमाणपत्रांचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे प्रमाणपत्र मिळविण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com