kunbi certificatesakal
छत्रपती संभाजीनगर
Kunbi Certificate : दोन लाख ११ हजार कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप; बीड जिल्ह्यात सर्वाधिक
मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर कुणबी नोंदी शोधून प्रशासनाने प्रमाणपत्र द्यायला सुरवात केली.
छत्रपती संभाजीनगर - मराठा आरक्षणाच्या आंदोलनानंतर कुणबी नोंदी शोधून प्रशासनाने प्रमाणपत्र द्यायला सुरवात केली. त्यानुसार मराठवाड्यात आतापर्यंत दोन लाख ११ हजार ६७२ जणांनी कुणबी प्रमाणपत्रे काढली आहेत. सर्वाधिक प्रमाण बीड जिल्ह्यात असून १ लाख ४१ हजार ९०५ जणांनी कुणबी प्रमाणपत्रे मिळवली आहेत. विभागीय आयुक्तालयातील सूत्रांकडून मंगळवारी (ता. सहा) ही माहिती देण्यात आली.