जिल्हाभरातील कुणबी मराठा नोंदीची माहिती ऑनलाईन उपलब्ध

जिल्हाभरातील कुणबी मराठा नोंदीची माहिती ऑनलाईन उपलब्ध
Published on
कुणबी मराठा नोंदीच्या माहितीसाठी शिबिरे १० ते १७ सप्टेंबर दरम्यान सर्व तालुक्यांत मंडळनिहाय नियोजन छत्रपती संभाजीनगर, ता. ८ ः कुणबी नोंदीची माहिती आता शिबिरात मिळणार असून, ही शिबिरे मंडळनिहाय होणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्तांनी दिली. मागील आठवड्यात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष तथा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागीय आयुक्तांना मंडळनिहाय शिबिरे लावण्याचे आदेश दिले होते. १० ते १७ दरम्यान सर्व तालुक्यांत मंडळनिहाय कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरण, तसेच याद्या पाहण्यासाठी शिबिरे होणार आहेत. या सर्व नोंदी व त्यांचे दस्तऐवज डिजिटल स्वरूपात जिल्ह्याच्या https://chhatrapatisambhajinagar.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर या नोंदी उपलब्ध करून दिल्या आहेत. संकेतस्थळावर मराठा कुणबी दस्त नोंदी, असा स्वतंत्र टॅग उपलब्ध करून दिला आहे. -------- मराठवाड्यात १७ सप्टेंबरला विशेष ग्रामसभा घेऊनही माहिती देण्याचे नियोजन करा. सापडलेल्या या नोंदीपैकी मोडी लिपी, उर्दू नोंदींच्या भाषांतर, लिप्यांतराचीही सोय उपलब्ध करून द्या, अशा सूचनाही विखे पाटील यांनी दिल्या. १० ते १७ दरम्यान सर्व तालुक्यात मंडळनिहाय कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वितरण, तसेच याद्या पाहण्यासाठी शिबिरे होणार आहेत. --- जिल्ह्यात मंडळनिहाय होणारी शिबिरे - अपर तहसील छत्रपती संभाजीनगर अंतर्गत १० ते १७ सप्टेंबरला अनुक्रमे भावसिंगपुरा, पंढरपूर, कांचनवाडी, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर या पाच मंडळांत शिबिर होईल. - छत्रपती संभाजीनगर अंतर्गत याच तारखेला चौका, वरूड काझी, पिसादेवी, शेकटा, लाडसावंगी, चिकलठाणा, करमाड कचनेर, चित्तेपिंपळगाव या नऊ मंडळांत. - पैठण तालुक्यातील एकाच दिवशी दोन मंडळांत (पाचोड, आडूळ), (आपेगाव, विहामांडवा), (पैठण, पिंपळवाडी), (बालानगर, नांदर), (ढोरकीन, निलजगाव), (१७-बिडकीन, लोहगाव) या बारा मंडळांत. - फुलंब्री तालुक्यातील आळंद, बाबरा, पिरबावडा, वडोद बाजार या पाच मंडळांत. - खुलताबाद तालुक्यातील खुलताबाद, वेरूळ, सुलतानपूर, बाजारसावंगी या चार मंडळांत. - कन्नड तालुक्यातील १० सप्टेंबरला नाचनवेल, चिंचोली, लिंबाजी या तीन मंडळांत, देवगाव रंगारी, चापानेर, हतनूर, चिकलठाण, कन्नड- नागद, करंजखेडा या दहा मंडळांत. - सिल्लोड तालुक्यातील १० सप्टेंबरला (भराडी, बोरगाव बाजार, आमठाणा), (सिल्लोड, पालोद, निल्लोड), अंभई, (अजिंठा, शिवना), (गोळेगाव बु., उंडणगाव) या ११ मंडळांत. - सोयगाव तालुक्यातील ११ सप्टेंबरला (सोयगाव, सावळदबारा) १५ सप्टेंबरला जरंडी, १६ सप्टेंबरला बनोटी या मंडळांत. - गंगापूर तालुक्यातील (वाळूज, तुर्काबाद), (आसेगाव, गाजगाव), (हर्सूल, डोणगाव), (सिद्धनाथ वडगाव, गंगापूर), (मांजरी, जामगाव), (भेंडाळा, शेदूरवादा) - वैजापूर तालुक्यात (गारज, शिऊर), (लोणी खु., जानेफळ), (खंडाळा, बोरसर), (लासूरगाव, महालगाव), (बाबरा, नागमठाण), (वैजापूर, घायगाव) या मंडळांत शिबिर होणार आहे. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com