Sambhaji Nagar News : मारहाणीत मजुराचा मृत्यू

१२ डिसेंबरला चिकलठाणा येथे हा प्रकार घडला. शेख नब्बी शेख अब्दुल (वय ५४, रा. मुल्ला गल्ली, चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे.
crime
crimeesakal

छत्रपती संभाजीनगर : शेतात पाणी भरण्यासाठी सोबत नेलेल्या मजुराचा मारहाणीत मृत्यू झाला. १२ डिसेंबरला चिकलठाणा येथे हा प्रकार घडला. शेख नब्बी शेख अब्दुल (वय ५४, रा. मुल्ला गल्ली, चिकलठाणा) असे मृताचे नाव आहे.

या प्रकरणी आरोपी शेतमालकावर सिडको एमआयडीसी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मृताची पत्नी शेख शमीना शेख नब्बी यांनी तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले आहे, की १२ तारखेला रात्री ९ वाजता शेख नब्बी हे घरी असताना त्यांच्या परिचयाचे गणेश गोपीनाथ बकाल आणि आकाश नावाचे दोघे त्यांच्या घरी आले.

crime
Sambhaji Nagar News : बॉयफ्रेंड भोवला ११ लाखाला!

शेतात पाणी भरण्यासाठी नब्बी यांना सोबत घेऊन गेले. सकाळी पती घरी आला नसल्याने पत्नीने आकाशच्या घरी जाऊन चौकशी केली. या वेळी आकाशने रात्री गणेश बकाल आणि नब्बी हे बकाल यांच्या शेतात गेले होते, अशी माहिती दिली. यानंतर काही लोकांनी नब्बी यांचा बकाल यांच्या शेतात मृत्यू झाल्याची माहिती शमीना यांना दिली.

शमीना यांनी नातेवाईकांसह घाटी रुग्णालय गाठले. यावेळी त्यांच्या पतीच्या मृतदेहावर मारहाणीच्या खुणा दिसून आल्या. या प्रकरणी शेख शमीना यांच्या तक्रारीवरून शेतमालक गणेश बकालविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com