क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या २३२ व्या सार्वजनिक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम

क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या २३२ व्या सार्वजनिक जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
Published on: 
क्रांतिवीर लहुजी साळवेंच्या जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम परभणी, ता.१३ : क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या २३२ व्या सार्वजनिक जयंतीनिमित्त शनिवारी (ता.१४) परभणी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त अभिवादन सभा, तैलचित्राची मिरवणूक, साडी वाटप आणि अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे. जयंतीनिमित्त सकाळी अकराला लहुजीनगर येथील लहुजी साळवे पुतळा परिसरात अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे उद्‍घाटन पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते होणार असून, स्वागताध्यक्ष म्हणून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद भरोसे उपस्थित राहणार आहेत. महापौर सय्यद इकबाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार अच्युत महाराज दस्तापूरकर, मुख्य प्रवर्तक श्रीकांत विटेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे अध्यक्ष राधाजी शेळके हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील प्रसिद्ध साहित्यिक आसाराम कसबे प्रमुख व्याख्याते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी दीपावली आणि जयंतीनिमित्त महिलांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी दोनला क्रांतिवीर लहुजी साळवे यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करीत या मिरवणुकीचा समारोप बसस्थानक परिसरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ होणार आहे. त्यानंतर उपस्थितांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सर्व कार्यक्रमांना समाजबांधव, नागरिक आणि लहुजी साळवे यांच्या अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जयंती समितीचे अध्यक्ष अमर ओव्हाळ यांच्यासह काशीनाथ गायकवाड, दिलीप सावळे, गोविंद कांबळे, गणेश पवार, भारत पारडे, राजू सोनवणे, गणेश गायकवाड आदींनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.