Sanjay Shirsat : शेंद्रा एमआयडीसीचा भूखंड थेट शिरसाटांच्या मुलाच्या नावावर? जलीलांचे आरोप गंभीर
imtiaz jaleel : शेंद्रा एमआयडीसीमधील ट्रक टर्मिनलसाठी राखीव जागा पालकमंत्र्यांच्या मुलाला देण्यात आल्याचा आरोप होत असून, इम्तियाज जलील यांनी तीव्र टिका केली आहे.
छत्रपती संभाजीनगर : हॉटेल विटस् प्रकरणापाठोपाठ शेंद्रा औद्योगिक वसाहतीतील २१ हजार २७५ चौरस मीटरचा अवाढव्य भूखंड मुलाला देण्यात आल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने पालकमंत्री संजय शिरसाट चांगलेच अडचणीत आले.