hard disk ram rate hike
sakal
छत्रपती संभाजीनगर - माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर वेगाने वाढला. या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणाऱ्या हार्डवेअरच्या किमतीत आता प्रचंड वाढ झाली. संगणक आणि लॅपटॉप क्षेत्रात महागाईचा भडका उडाला आहे.
रॅम, हार्ड डिस्क आणि एसएसडीसारख्या महत्त्वाच्या सुट्या भागांच्या किमतीत तब्बल ३२५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याने संगणक बाजारात दरवाढ झाली आहे.