एक लाखाच्या लॅपटॉपसह बॅग परत

एक लाखाच्या लॅपटॉपसह बॅग परत
Published on
LTR22HTP04.jpg लातूर ः प्रवाशाची लॅपटॉपची बॅग परत करणाऱ्या ऑटोरिक्षा चालक रमाकांत कसबे यांचा सत्कार करताना पोलिस निरिक्षक अरविंद पवार. लाखाच्या लॅपटॉपसह बॅग केली परत - लातुरात ऑटोरिक्षा चालकाने दाखवला प्रामाणिकपणा सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. २२ ः ऑटोरिक्षाने प्रवास करीत असताना एका प्रवाशाची एक लाखाचा लॅपटॉप असलेली बॅग विसरली होती. ऑटोरिक्षा चालक रमाकांत कसबे यांनी तातडीने ही बॅग विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी मूळ मालकाचा शोध घेत ही बॅग परत केली. यावेळी ऑटोरिक्षा चालक कसबे यांच्या प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करण्यात आला. ऑटोचालक रमाकांत अभंग कसबे (रा. राजीवनगर) यांच्या ऑटोमधून तय्यब चांदपाशा शेख (रा. पानचिंचोली) हे लातूर येथे कामानिमित्त आले असता घाईगडबडीत शेख यांची लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे व इतर साहित्य असलेली बॅग ऑटोमध्येच राहिली. प्रवासी निघून गेल्यानंतर काही वेळाने चालक रमाकांत कसबे यांच्या निदर्शनास ही बॅग आली. बॅगेतील साहित्याची पाहणी केल्यानंतर विसरल्याचे त्यांच्या लक्षात येताच कसबे यांनी सदर बॅग विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात आणून जमा केली. पोलिसांनी बॅगेतील कागदपत्रांच्या आधारे तिच्या मूळमालकाचा शोध घेतला. त्यानंतर तय्यब चांदपाशा शेख यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलिस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. ओळख व मालकीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी एक लाखाचा लॅपटॉप, महत्त्वाची कागदपत्रे, ओळखपत्रे व इतर साहित्य असलेली बॅग तय्यब शेख यांच्या स्वाधीन केली. साहित्याची बॅग मिळाल्याने शेख यांनी विवेकानंद चौक पोलिस, ऑटोचालक रमाकांत कसबे यांचे आभार मानले. दरम्यान, ऑटोचालक रमाकांत कसबे यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाचे कौतुक करत पोलिस निरीक्षक अरविंद पवार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पोलिस उपनिरीक्षक चव्हाण, उपनिरीक्षक आंधळे, अंमलदार धैर्यशील मुळे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com