'पोकलेन'चे स्फोट होऊन यंत्राचे तुकडे शरीरात घुसल्याने दोघांचा धक्कादायक मृत्यू

जवळपास चाळीस ते पन्नास फुट लांब असलेल्या पोकलेनद्वारे देवकरा पाटीपासून देवकरा गावात जाणाऱ्या रस्त्यावर कामकाज सुरू करताना अचानक स्फोट झाला.
'पोकलेन'चे स्फोट होऊन यंत्राचे तुकडे शरीरात घुसल्याने दोघांचा धक्कादायक मृत्यू

अहमदपूर (जि.लातूर) : तालुक्यातील देवकरा येथे विहिर खोदताना पोकलेनला आग लागून स्फोट झाल्याने दोन ठार, एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.कोळवाडी येथील  नागनाथ बाबू दहिफळे (वय ३४) व बाबू पांडुरंग दहिफळे (वय ६५) हे दोघे पितापुत्र पोकलेन यंत्र भाडेतत्त्वावर घेऊन विहीर खोदण्याचा व्यवसाय करतात. या दोघांनी तालुक्यातील देवकरा येथील शेतकरी प्रभु विनायक मुरकूटे (वय ६०) यांच्या देवकरा पाटी ते देवकरा गावात जाणाऱ्या शिवारातील शेतात विहीर खोदण्याचे काम घेतले होते. विहीर खोदण्याचे काम दोन दिवसापासून चालू असून रविवारी (ता.१८) रात्री आठ वाजता पोकलेनचा चालक, बाबू पांडुरंग दहिफळे व शेतमालक प्रभु विनायक मुरकूटे हे तिघे जण विहीर खोदण्याचे उर्वरित काम करण्यासाठी जात होते.

जवळपास चाळीस ते पन्नास फुट लांब असलेल्या पोकलेनद्वारे देवकरा पाटीपासून देवकरा गावात जाणाऱ्या रस्त्यावर कामकाज सुरू करताना अचानक स्फोट झाला व पोकलेन यंत्राचे तुकडे होऊन यामध्ये बाबू पांडुरंग दहिफळे व प्रभु विनायक मुरकूटे यांच्या शरीरात घुसल्याने ते जागीच ठार झाले, तर पोकलेन यंत्र चालक गंभीर जखमी झाला आहे. पोकलेनची आग आटोक्यात आणण्यासाठी अहमदपूर येथील नगर परिषदेच्या अग्निशामन दलास बोलावण्यात आले होते. पोकलेन स्फोट एवढा भयंकर होता की दोन किलोमीटर अंतरावरील लोकांना याचा आवाज ऐकू येत होता. पोकलेन जळून खाक झाले आहे.या प्रकरणी किनगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास  सहायक पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन अन्सापुरे करीत आहेत.

स्फोटाचे कारण अस्पष्ट : पोकलेनची लांबी अधिक असल्याने त्याचा समोरील भाग विद्युत पुरवठा करणाऱ्या तारेला लागून विद्युत ठिणगी पडली व त्या पोकलेनमध्ये दगड फोडण्याचे बारूद व डिझेल असल्याने आग लागून स्फोट झाला असल्याचा प्राथमिक अंदाज गावकऱ्यांनी सांगितला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com