‘चन्नबसवेश्वर’च्या चार संशोधन प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड

‘चन्नबसवेश्वर’च्या चार संशोधन  प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड
Published on: 
लातूर : स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ (नांदेड) येथे आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेमधील लातुरातील ‘चन्नबसवेश्वर’चे विजेते विद्यार्थी. -- ‘चन्नबसवेश्वर’चे चार संशोधन प्रकल्प राज्यस्तरावर ---- विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये चमकदार कामगिरी लातूर, ता. ५ : नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ येथे आयोजित विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये लातुरातील चन्नबसवेश्वर फार्मसी महाविद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी करत एकूण चार पारितोषिके पटकावली. या संशोधन प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड झाली. विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेमध्ये महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत विजयानंदा खडकुतकर (ॲग्रिकल्चर ॲण्ड ॲनिमल हजबंडरी) व मयूरी चंद्रवंशी यांनी (मेडिसिन ॲण्ड फार्मसी) प्रथम क्रमांक मिळविला. रघुनाथ साखरे (प्यूअर सायन्स) ऋतुजा मड्डे यांनी (हयुमॅनिटीज, लॅग्वेजेस ॲण्ड आर्टस्) व्दितीय क्रमांक पटकावला. ‘चन्नबसवेश्वर’ फार्मसीच्या चार संशोधन प्रकल्पांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड झाली असून स्पर्धकांची मेहनत, मोलाचे योगदान, संस्थेचे प्रोत्साहन आणि सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे विद्यापीठस्तरीय अविष्कार संशोधन नवोपक्रम प्रकल्पात हे यश साध्य झाले. या यशाबद्दल संस्थेचे सचिव भीमाशंकर देवणीकर, सर्व विश्वस्त, महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व विभागांचे प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्यांनी विजेते विद्यार्थी आणि मार्गदर्शकांचे अभिनंदन केले. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.