Shocking Child Case in Latur
esakal
Latur Crime News : लातूर शहरातील श्यामनगर परिसरात माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडलीये. पती घरी उशिरा परतल्याच्या रागातून एका आईने आपल्या दीड वर्षांच्या (१८ महिन्यांच्या) चिमुरडीची निर्दयीपणे हत्या केल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. अश्विनी चौगुले असे आरोपी महिलेचे नाव असून, तिने नंदिनी नावाच्या आपल्या मुलीवर चाकूने सपासप वार करत तिचा जीव घेतला.