शहरात होणार ताप सर्वेक्षण मोहिम डेंगी प्रतिबंधासाठी १९ सप्टेंबर दरम्यान विशेष अ‍ॅबेटिंग राऊंड; ऑगस्टमध्ये १५ जण डेंगी पॉझिटिव्ह तर तिघांना चिकुनगुनिया

शहरात होणार ताप सर्वेक्षण मोहिम   डेंगी प्रतिबंधासाठी १९ सप्टेंबर दरम्यान विशेष अ‍ॅबेटिंग राऊंड; ऑगस्टमध्ये १५ जण डेंगी पॉझिटिव्ह तर तिघांना चिकुनगुनिया
Published on
लातूरमध्ये होणार ताप सर्वेक्षण मोहीम ----- ऑगस्टमध्ये १५ जण डेंगी पॉझिटिव्ह तर तिघांना चिकुनगुनिया --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ७ : शहर महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील डेंगी व इतर डासजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विशेष अ‍ॅबेटिंग राऊंड, ताप सर्वेक्षण तसेच डास उत्पत्तीस्थळ निर्मूलनाची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम आजपासून १९ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. ऑगस्ट शहरामध्ये डेंगी संशयित रुग्णांचे ३८२ रक्तजल नमुने संकलित करण्यात आले. त्यापैकी १५ रुग्ण डेंगी पॉझिटिव्ह आढळून आले असून, ३ रुग्ण चिकुनगुनिया पॉझिटिव्ह आढळले आहेत. विशेष बाब म्हणजे, पॉझिटिव्ह आढळलेल्या १५ रुग्णांपैकी १२ रुग्ण हे १६ वर्षांखालील वयोगटातील आहेत. त्यामुळे शाळकरी मुलांमध्ये तापाचे सर्वेक्षण, जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर देण्यात येत आहे. आस्थापनांमध्ये विशेष सर्वेक्षण डेंगीचा प्रसार रोखण्यासाठी शहरातील शाळा तसेच शासकीय आस्थापनांमध्ये विशेष ताप सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये तापाची लक्षणे आढळल्यास त्यांची आवश्यक तपासणी करून पुढील उपचारासाठी आरोग्य केंद्राकडे संदर्भित करण्यात येईल. तसेच शाळा व शासकीय आस्थापनांच्या परिसरात डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून पाणी साचलेली ठिकाणे नष्ट करणे, अ‍ॅबेटिंग करणे व आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार आहेत. डासांचा प्रादुर्भाव व स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन गरजेनुसार धूरफवारणी (फॉगिंग) देखील करण्यात येणार आहे, असे आरोग्य विभागातर्फे सांगण्यात आले. कोट ---- नागरिकांनी डेंगी प्रतिबंधक उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून आपले घर, शाळा, आस्थापना व परिसर डासमुक्त ठेवण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे. -राहुल कुलकर्णी, आयुक्त ------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com