लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा

लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा
Published on
LTR17HTP02.jpg लातूर ः जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा या मागणीचे निवेदन पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना देताना छावा संघटनेचे सिद्धाजी जगताप, दीपक नरवडे, विवेक साळुंके, सुदर्शन ढमाले. ---- लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा छावा संघटनेची पालकमंत्री भोसलेंकडे मागणी --- लातूर, ता. १७ ः लातूर जिल्ह्यात मागील जवळपास दोन महिन्यांपासून समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाअभावी खरीप पिके मोठ्या संकटात सापडली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी छावा मराठा युवा संघटनेने पालमकंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील खरीप पिके करपली असून, शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने परिस्थितीची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. लातूर जिल्हा तात्काळ कोरडा दुष्काळग्रस्त जाहीर करावा. दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी एक लाख रुपये अनुदान देण्यात यावे. जनावरांसाठी तत्काळ चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात. जनावरांना पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी टॅँकर व इतर आवश्यक उपाययोजना करण्यात यावी. शेतऱ्यांकडील पीककर्जाच्या वसुलीस स्थगिती देऊन दुष्काळग्रस्त भागासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करण्यात यावे. लातूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. त्यामुळे केवळ कागदी घोषणा न करता तत्काळ प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, शेतकऱ्यांच्या संयमाच्या अंत होण्यापूर्वी शासनाने तातडीने निर्णय येऊन घेऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी संघटनेचे मराठवाडा संपर्क प्रमुख सिद्धाजी जगताप, जिल्हाध्यक्ष दीपक नरवडे, जिल्हा संघटक विवेक साळुंके, तालुकाध्यक्ष सुदर्शन ढमाले यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com