
लातूर : शहरातील अवैध कत्तलखान्यावरून मंगळवारी (ता. ११) सकल हिंदू समाज आक्रमक झाला. येथे महापालिकेवर मोर्चा काढत निदर्शने केली. तीन दिवसांच्या आत अनाधिकृत कत्तलखाने बंद न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. यावेळी विविध घोषणांनी महापालिकेचा परिसर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडला.