विभागीय कराटे स्पर्धेसाठी ‘किडीज’च्या पाच विद्यार्थ्यांची निवड

विभागीय कराटे स्पर्धेसाठी  ‘किडीज’च्या पाच विद्यार्थ्यांची निवड
Published on: 
लातूर : विभागीय कराटे स्पर्धेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांसमवेत प्राचार्या प्रीती शाह, उपप्राचार्या नैना पाटील, शाळा व्यवस्थापक रामेश्वर सगरे. -- विभागीय कराटेसाठी पाच जणांची निवड ----------- किडीज इन्फो पार्क स्कूलचे जिल्हास्तरावर यश --- लातूर, ता. २८ : जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत किडीज इन्फो पार्क स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत घवघवीत यश संपादन केले आहे. जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजय मिळवला. या कामगिरीच्या जोरावर पाच विद्यार्थ्यांनी विभागीय स्तरावरील कराटे स्पर्धेसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्यांत श्रेयस कदम, सोहम कदम, अभिषेक गवळी, शौर्य जायभाय, सूर्या जायभाय या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.त्यांच्या सातत्यपूर्ण सरावाचे, मेहनतीचे आणि खेळाप्रती असलेल्या समर्पणाचे फलित म्हणून त्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेच्या प्राचार्या प्रीती शाह, उपप्राचार्या नैना पाटील, प्री-प्रायमरी डायरेक्टर इशिका शाह आणि शाळा व्यवस्थापक रामेश्वर सगरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांना क्रीडाशिक्षक अविनाश पवार अजित आडे आणि पल्लवी राठोड यांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळाले. ---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com