फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संमेलनाचे आयोजन

फुले, शाहू, आंबेडकर  साहित्य संमेलनाचे आयोजन
Published on: 
लातूरमध्ये फुले, शाहू, आंबेडकर साहित्य संमेलन ---- डिसेंबरमध्ये आयोजन : ग्रंथदिंडी, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन रंगणार सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ३० ः येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य अकादमीच्या वतीने १२ व १३ डिसेंबर रोजी येथे फुले, शाहू, आंबेडकर जिल्हास्तरीय साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. येथील सावेवाडीतील श्याम मंगल कार्यालयात हे संमेलन होणार आहे. या संमेलनात १२ डिसेंबर रोजी ग्रंथदिंडी, उ‌द्‍घाटन कार्यक्रम, परिसंवाद, कथाकथन, कविसंमेलन व रात्री सांस्कृतिक कार्यक्रम तसेच साहित्य सेवा सन्मान पुरस्कार व १३ डिसेंबर २०२६ रोजी सकाळी बाल साहित्यिक मेळावा, महिला लेखिका मेळावा, कथाकथन, परिसंवाद, निमंत्रितांचे कविसंमेलन व समारोप कार्यक्रम होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस संमेलनाध्यक्ष असणार आहेत. स्वागताध्यक्ष अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर, सचिव प्रकाश घादगिने उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात शाळा, महाविद्यालय, ग्रंथालय संघ, ग्रंथमित्र व जिल्ह्यातील साहित्याकांचा सहभाग राहणार आहे. या संमेलनासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी व डॉ. बी.जी. शेखर पाटील यांची उपस्थिती राहणार आहे. या जिल्हास्तरीय संमेलनास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. माधव गादेकर, प्रकाश घादगिने, ॲड. श्रीधर गायकवाड, ॲड. अंगद गायकवाड, अशोक तोगरे, बामन कांबळे, डॉ. संजय जमदाडे, उत्तम दोरवे, अर्जुन कांबळे, छगन घोडके, प्रा. रामकिशन समुखराव, कुसुमताई बोडके, वंदना गादेकर, प्राचार्य डॉ. दुष्यंत कटारे, जी.जी. कांबळे, बालाजी सांळुके, बी.पी. सूर्यवंशी, सुनीता घोडके, मारुती सूर्यवंशी, प्रा. शिवशरण हावळे, बालाजी साबळे, अमृतराव सूर्यवंशी, संजीवकुमार गायकवाड, विलास आल्टे, अंगद भोसले, लालासाहेब बनसोडे यांनी केले आहे. -----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.