भाविकांच्या जॅकेट, सॅक, बाटल्यांना रिफ्लेक्टर

भाविकांच्या जॅकेट, सॅक, बाटल्यांना रिफ्लेक्टर
Published on: 
LTR26B15361 लातूर ः तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी पायी जाणाऱ्या भाविकांच्या सॅकला रिफ्लेक्टर लावताना शहर वाहतूक शाखेचे पोलिस अधिकारी. भाविकांच्या जॅकेट, सॅक, बाटल्यांना रिफ्लेक्टर ------- तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्यांसाठी लातूर पोलिसांचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. १७ ः नवरात्रोत्सवानिमित्त तुळजापूर येथे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जिल्ह्यातून हजारो भाविक पायी प्रवास करतात. रात्रीच्या अंधारात महामार्गावरून पायी जाणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेचा विचार करून भाविकांच्या अंगावरील जॅकेट, पाठीवरील सॅक तसेच पाण्याच्या बाटल्यांवर रिफ्लेक्टर लावून त्यांचा रात्रीचा प्रवास अधिक सुरक्षित करण्याचा उपक्रम लातूर पोलिस दलाच्या शहर वाहतूक शाखेने हाती घेतला आहे. नवरात्रोत्सवादरम्यान तुळजापूरकडे जाणाऱ्या भाविकांची मोठी वर्दळ असते. भाविक रात्रंदिवस पायी प्रवास करत असताना महामार्गावरून वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता असते. रात्रीच्या वेळी अंधारामुळे पायी चालणारे भाविक वाहनचालकांच्या सहज लक्षात येत नाहीत. ही बाब लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. शहर वाहतूक शाखेच्या वतीने खोपेगाव अन्नछत्र येथे विशेष पोलिस पॉइंट सुरू करण्यात आला आहे. दसरा सण संपेपर्यंत या ठिकाणी २४ तास पोलिस अंमलदार आणि होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांच्या जॅकेट, सॅक आणि पाण्याच्या बाटल्यांवर रिफ्लेक्टर लावण्यात येत आहेत. वाहनांच्या प्रकाशझोतात हे रिफ्लेक्टर चमकल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावरून पायी जाणारे भाविक दूरवरूनच दिसू शकतात. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यास मदत होणार आहे. भाविकांना सुरक्षितपणे तुळजापूरपर्यंत पोहोचता येईल, असा या उपक्रमामागील उद्देश आहे. अधीक्षकांकडून दैनंदिन आढावा नवरात्रोत्सव संपेपर्यंत भाविकांच्या सुरक्षिततेसाठी हा उपक्रम चोवीस तास सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या हद्दीतून तुळजापूरकडे पायी जाणारा कोणताही भाविक रिफ्लेक्टरशिवाय प्रवास करणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक तांबे यांनी शहर वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांना दिल्या आहेत. या उपक्रमाचा दैनंदिन आढावाही घेतला जात आहे. ----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com