लातुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

लातुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा
Published on
लातुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ---- अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त; २० जण ताब्यात --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. २२ ः येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारत २० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन लाख ६३ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गणेशोत्सव शांततेत, निर्भय व सुरक्षित वातावरणात पार पडावा, तसेच शहरातील अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलिस दलाच्या वतीने अवैध धंद्यांविरुद्ध विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला अधिक गतिमान करत लातूर शहर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे यांनी स्वतः कारवाईत सहभागी होत शहरातील दोन ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाड टाकली. या दोन्ही कारवायांमध्ये एकूण २० जुगाऱ्यांना ताब्यात घेत दोन लाख ६३ हजार ९५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मेघराजनगर परिसरात उघड्यावर तीनपत्ती जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून सात जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ९३ हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ताब्यात घेतलेल्या सात जणांविरुद्ध विवेकानंद चौक ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. येथील आनंदनगर परिसरात दुसरी कारवाई करण्यात आली. निवासी घरामध्ये तिर्रट जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला. यावेळी १३ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रक्कम, मोबाइल व एका वाहनासह एकूण एक लाख ७० हजार ६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या १३ जणांविरुद्ध विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. या कारवाईकरिता उपविभागीय पोलिस अधिकारी समीरसिंह साळवे, उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलिस अंमलदार महेश पारडे, अरविंद वाघमोडे, पांडुरंग सगरे, गणेश मोरे, गांधी चौक पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार राम गवारे, रवी जाधव, संतोष गिरी, भाडुळे, सचिन चंद्रपाटले, विवेकानंद चौक ठाण्याचे सहायक फौजदार रवी गोंदकर, पोलिस अंमलदार खुर्रम काझी, गणेश यादव, यशपाल कांबळे यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com