लातूर : शहरासह जिल्ह्यात फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर लातूर पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. यात वर्षभरात ३४ लाखांच्या ६८४ बुलेटच्या सायलेंसरवर शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी रोलर फिरवला आहे..शहर व जिल्ह्यात बुलेटला आवाजाचा सायलेंसर बसवून आवाज करीत सुसाट चालवण्याचा प्रकार वाढले होते. यात तरुणांचा अधिक समावेश होता. पण, यातून कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक गणेश कदम यांच्या नेतृत्वात वाहतूक नियंत्रण पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली..मोटार वाहन कायद्यांतर्गत २०२४ मध्ये मॉडिफाइड सायलेंसरच्या २९० केसेस करून दोन लाख ८२ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला. तर, कर्णकर्कश हॉर्नवर ५४ केसेस करून तीन लाख ५२ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.वर्षभरात तीन मोहिमा राबवून एकूण ६८४ वाहनांचे अंदाजे ३४ लाख रुपयांचे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. संबंधित वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या ३४ लाखांच्या फटाका सायलेंसरवर पोलिसांनी थेट रोलर फिरवत ते नष्ट केले..मोटार वाहन कायद्यांतर्गत २०२४ मध्ये मॉडिफाइड सायलेंसरच्या २९० केसेस करून दोन लाख ८२ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला. तर, कर्णकर्कश हॉर्नवर ५४ केसेस करून तीन लाख ५२ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.वर्षभरात तीन मोहिमा राबवून एकूण ६८४ वाहनांचे अंदाजे ३४ लाख रुपयांचे सायलेन्सर पोलिसांनी जप्त केले. संबंधित वाहनधारकांविरोधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या ३४ लाखांच्या फटाका सायलेंसरवर पोलिसांनी थेट रोलर फिरवत ते नष्ट केले..पोलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येऊनही काही हौशी वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरले जात आहेत. याबाबत लातूर शहर वाहतूक शाखा आणि विविध पोलिस ठाण्यांच्या पोलिस अंमलदाराकडून कारवाई केली जात आहे. या कारवाईनंतरही काही वाहनधारक मूळ सायलेंसर वापरत नसल्याचे दिसून आले. अखेर वर्षभरात लातूर पोलिसांनी विविध मार्गांवर वाहन तपासणी करून फटाका (मॉडिफाय) सायलेंसर जप्त केले. या जप्त केलेल्या सायलेंसरबरोबरच वाहनधारकांना दंडही करण्यात आला. काहींवर थेट न्यायालयात खटलेही दाखल करण्यात आले आहेत.वर्षभरात ३४ लाखांच्या ६८४ सायलेंसरवर फिरवला रोलर.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.