Latur Highway Road Accident
esakal
लातूर : येथील राजीव गांधी चौक ते नांदेड नाका जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वसंतराव नाईक चौकात बुधवारी (ता. ३१) मध्यरात्री कारच्या धडकेत एका तरुणीचा मृत्यू (Latur Highway Road Accident) झाला. त्यानंतर गुरुवारी (ता. १) या तरुणीच्या नातेवाइकासह नागरिकांनी गतिरोधक बसवण्याच्या मागणीसाठी वसंतराव नाईक चौकात मृतदेहासह राष्ट्रीय महामार्गाच्या विरोधात रास्ता रोको आंदोलन केले.