रेणापूर नाका ते गरुड चौक रस्ता होणार चौपदरी

रेणापूर नाका ते गरुड चौक रस्ता होणार चौपदरी
Published on: 
LTR26B15587 नवी दिल्ली ः येथे नितीन गडकरी यांच्याशी संवाद साधताना डॉ. अर्चना पाटील. --- लातुरातील गरूड चौक रस्ता होणार चौपदरी --------- केंद्रीय रस्ते निधीतून ३८ कोटींचा निधी मंजूर --- सकाळ वृत्तसेवा लातूर, ता. ८ : शहरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या नवीन रेणापूर नाका चौक ते गरूड चौक रस्ता चौपदरीकरणासाठी केंद्रीय रस्ते निधी अंतर्गत तब्बल ३८ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अर्चना पाटील-चाकूरकर यांनी पाठपुरावा केला होता. शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता वाहनांचा ताण आणि सातत्याने होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याची मागणी डॉ. पाटील यांनी शासनाकडे लावून धरली होती. यासाठी त्यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केंद्रीय रस्ते निधीतून निधी मंजूर करण्याची मागणी केली होती. तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम व पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचीही प्रत्यक्ष भेट घेऊन निधी मंजुरीसंदर्भात निवेदन दिले होते. संबंधित विभागांशी सातत्याने संपर्क ठेवत केलेल्या पाठपुराव्याची दखल घेत अखेर या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी ३८ कोटींचा निधी मंजूर झाला. या निधीमुळे रेणापूर नाका ते गरूड चौक हा मार्ग अधिक रुंद, सुरक्षित आणि वाहतुकीसाठी सुलभ होणार आहे. परिणामी, शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून लातूरच्या पायाभूत सुविधांच्या विकासाला नवी गती मिळणार आहे. याबाबत डॉ. पाटील म्हणाल्या, लातूरच्या विकासासाठी मिळवलेला प्रत्येक निधी हा जनतेच्या हिताचा आहे. रेणापूर नाका ते गरूड चौक रस्ता चौपदरीकरणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निधी मंजूर झाला असून याचा लाभ लातूरकरांना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.