अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे नोंदवा : प्रवीण दरेकर

Legislative Council Praveen Darekar.
Legislative Council Praveen Darekar.
Updated on
Summary

श्री. दरेकर म्हणाले, ‘‘समाजाला शिव्या देणाऱ्या पोलिसांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न नारीयलवाले यांनी केली होता.

औरंगाबाद : जालना येथील भाजपचे पदाधिकारी असलेले शिवराज नारीयलवाले यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे नोंदवा, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्याकडे निवेदनाद्वारे शनिवारी (ता. २९) केली. मागणीची पूर्तता झाली नाही तर भाजप युवा मोर्चातर्फे राज्यभरात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही श्री. दरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. (Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar said that a case should be registered against the police for inhuman beatings)

Legislative Council Praveen Darekar.
औरंगाबाद विद्यापीठाचा ६१ वा दीक्षांत समारंभ २५ जूनला

श्री. दरेकर म्हणाले, ‘‘समाजाला शिव्या देणाऱ्या पोलिसांचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न नारीयलवाले यांनी केली होता. त्यामुळे त्यांना गुराढोराप्रमाणे मारहाण करण्यात आली. महिनाभर हे प्रकरण दाबून ठेवण्यात आले. युवा मोर्चाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर पाच पोलिसांना निलंबित करण्यात आले. यात पीआय महाजन हे स्वत: मारहाण करीत असल्याचे दिसत आहे. यासह त्यांना आदेश देणारा डीवायएसपीही यात आहे. हे दोन प्रमुख सूत्रधार आहेत. त्यांच्यावर गुन्हे नोंद व्हायला हवेत; अन्यथा आंदोलन करू,’’ असा इशारा त्यांनी दिला.

Legislative Council Praveen Darekar.
PHOTOS: औरंगाबाद जिल्ह्यात पावसाच्या सरी

पंतप्रधान भेटीच्या विषयाचे राजकारण

‘‘छत्रपती संभाजीराजे यांच्या पंतप्रधानाच्या ४० भेटी झाल्या आहेत. चार भेटी झाल्या नसतील तर त्याचे अशा प्रकारे राजकारण करणे चुकीचे आहे. भाजपने त्यांना सन्मानाने खासदार केले. कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस भेटीच्या विषयाचे राजकारण करीत आहेत,’’ असा आरोप दरेकर यांनी केला. दरम्यान, खासदार छत्रपती संभाजीराजे हे पक्ष काढणार असल्याविषयी विचारले असता दरेकर म्हणाले, ‘‘लोकशाही आहे. त्यांना पक्ष काढायचा अधिकार आहे. हा त्यांचा विषय आहे. मराठा समाजाला पाठबळ देणे, ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळवावे, ही भाजपची भूमिका आहे. यासह मराठा संघटनासोबत भाजप असेल,’’ असेही दरेकर म्हणाले.

(Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar said that a case should be registered against the police for inhuman beatings)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com