Aurangabad : गंगापूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात वासरु ठार, नागरिक भयभीत

बिबट्याच्या दहशतीने नागरिक भयभीत ,पिंजरा लावून जेरबंद करण्याची मागणी
Leopard attack
Leopard attackesakal

कायगाव (जि.औरंगाबाद) : कायगाव (ता.गंगापूर) परिसरात रविवारी (ता.२६) पहाटे जामगाव - कायगाव शिवारातील शेतात बांधलेल्या वासरूवर बिबट्याने हल्ला करून गायीच्या वासराला ठार केल्याची घटना घडली. त्यामुळे शेतकरी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. वन विभागाने या बिबट्याचा (Leopard) बंदोबस्त करण्यासाठी ताबडतोब पिंजरा लावावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. कायगाव (Gangapur) येथील शेतकरी राजेंद्र गायकवाड यांनी जामगाव-कायगाव शिवरस्त्याच्या लगत असलेल्या शेतात जनावरे नेहमी प्रमाणे बांधली. रविवारी पहाटे साडेपाचच्या (Aurangabad) सुमारास येथून ऊसतोडणीसाठी चाललेल्या लोकांना पत्र्याचा शेडमध्ये गाईचा वासरू मृत अवस्थेत दिसून आला.(Leopard Attack On Cattle In Gangapur Taluka Of Aurangabad)

Leopard attack
आईच्या निधनाचे दुःख सहन न झाल्याने विवाहित मुलीने केली आत्महत्या

त्यांनी पशुपालक राजेंद्र गायकवाड यांना फोन करुन सांगितले. लगेच गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. बिबट्याने तीन-चार महिन्याच्या गायीच्या वासराला चावा घेऊन ठार केले. सदरील घटनेची माहिती वन विभागाच्या कळविण्यात आली असून पशुवैद्यकीय डॉक्टरला ही बोलवण्यात आले. पण रविवारची सुटी असल्याने त्यांनी येण्याचे टाळले. सध्या ऊसतोड सुरू असल्याने बिबट्या ऊसातून निघून ऊसतोड कामगार लोकांवर हल्ला करू नये.

Leopard attack
मुख्यमंत्री ठाकरेंच्या आरोग्यासाठी 'तिरुपती'ला निघालेल्या सुमंत रुईकरांचे निधन

तसेच शेत वस्तीवर राहणाऱ्या शेतकऱ्यांवर आणि पशुधनावर हल्ला करून शिकार करू नये म्हणून दक्षता खबरदारी म्हणून वन विभागाने (Forest Department) या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ताबडतोब पिंजरा लावावा, अशी मागणी राजेंद्र गायकवाड, सोमनाथ गायकवाड, अनिल गायकवाड, समाधान गायकवाड, रवींद्र शिंदे , दीपक बिरुटे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com