
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांत शुक्रवारी पहाटे हलका पाऊस झाला. हा पाऊस रब्बी ज्वारी, गहू, करडईसाठी पोषक मानला जात आहे. परंतु, ढगाळ वातावरणाचा रब्बी पिकाला धोका होऊ शकतो, अशी भीती कृषी शास्त्रज्ञांनी व्यक्त केली.