चोरांचा वळविला मोर्चा पशुधनाकडे उमरगा, येरमाळा तालुक्यातून पावणेदोन लाखांच्या म्हशी चोरीला

चोरांचा वळविला मोर्चा पशुधनाकडे उमरगा, येरमाळा तालुक्यातून पावणेदोन लाखांच्या म्हशी चोरीला
Published on: 
चोरट्यांचा मोर्चा पशुधनाकडे उमरगा, येरमाळामध्ये दोन घटना; गुन्हे नोंद सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ३ : जिल्ह्यात गोठ्यात बांधलेली जनावरे चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. उमरगा आणि येरमाळा पोलिस ठाण्यांच्या हद्दीत घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी एकूण दोन लाख ४५ हजार रुपये किमतीचे पशुधन चोरून नेले. याप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. उमरगा तालुक्यातील जहागीर आष्टा येथे नागेराव राम जाधव (वय ५५) यांच्या शेतातील गट क्रमांक ९९/अ मधील गोठ्यातून रविवारी पहाटे चोरट्यांनी तीन म्हशी आणि एक वगार चोरून नेली. या जनावरांची किंमत एक लाख ३० हजार रुपये असून, या प्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दुसरी घटना कळंब तालुक्यातील पानगाव येथे घडली. गणेश विश्वनाथ बेडके (वय ४१) यांच्या शेतातील गट क्रमांक ३०/अ मधील गोठ्यात बांधलेली एक म्हैस आणि दोन रेडी चोरट्यांनी लंपास केल्या. या जनावरांची किंमत एक लाख १५ हजार रुपये आहे. याप्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दोन्ही घटनांमध्ये शेतकऱ्यांचे पशुधन चोरीला गेल्याने परिसरातील पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.