कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास गय करणार नाही: सरनाईक

कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास  गय करणार नाही: सरनाईक
Published on: 
कर्जवसुलीसाठी त्रास दिल्यास गय करणार नाही : सरनाईक सकाळ वृत्तसेवा धाराशिव, ता. ३ ः दुष्काळाच्या संकटाशी झुंजणाऱ्या शेतकऱ्यांना मायक्रोफायनान्स संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून कर्जवसुली किंवा व्याजासाठी त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. संकटाच्या काळात शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची अजिबात गय केली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. ‘मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण’ या अभिनव उपक्रमांतर्गत पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा भाग म्हणून सांजा परिसरातील एका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शेतकरी व त्यांच्या कुटुंबीयांना पालकमंत्री सरनाईक यांच्या हस्ते दिवाळी शिधा किटचे वाटप करण्यात आले. पालकमंत्री सरनाईक म्हणाले, की दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर शेतकऱ्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. आजची मदत ही केवळ सुरवात असून, संपूर्ण संकट काळात शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या दारात जाऊन विचारपूस करेल आणि पाठीशी खंबीरपणे उभा राहील. ........ ((कोट)) दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबातील आनंदाचे क्षण हिरावले जाऊ नयेत. घरातील मुला-मुलींच्या लग्नाची चिंता शेतकऱ्यांनी करू नये. पालकमंत्री म्हणून या जबाबदारीत मी कुठेही कमी पडणार नाही. शिवसेनेच्या वतीने लवकरच सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येईल. - प्रताप सरनाईक, पालकमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.